कळंब : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याना वाहतूक पोलिसांचा दणका

शहरात कुठेही वाहन पार्किंग करताय,आता हे वाहनचालंकाना महागात पडणार
Driving without a driving license
Driving without a driving licensesakal

कळंब : वाहन चालविण्याचा परवाना जवळ नाही ..दुचाकीवरून विना हेलमेट ट्रीपलसीट फिरताय.शहरात कुठेही वाहन पार्किंग करताय,आता हे वाहनचालंकाना महागात पडणार आहे.नियमभंग करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कळंबच्या वाहतूक पोलीसानी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवार (ता.२३) शहरातून दुचाकीवरून ट्रिपलसीट फिरणे,वाहन परवाना जवळ नसणे आशा वाहनचालकांना महागात पडले असून दुचाकीस्वराकडून वाहतूक शाखेच्या पोलीसांनी काही तासात २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.(traffic police has collected a fine of Rs 26,500 in a few hours)

अपघाताच्या वाढत्या घटना व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्र शासनाच्या मोटार वाहतूक विभागाने वाहन कायद्यात सुधारणा केली असून वाहतुकीचे नवीन नियम कळंबच्या वाहतूक पोलिसांनी अंमलात आणण्यास सुरवात केली आहे.शहरातून डबल,ट्रीपल सीट फिरणे,हॉर्न वाजविणे,दुचाकीला फेन्सि नंबर प्लेट असणे,वाहन परवाना नसताना वाहने चालविणे,कुठेही वाहने पार्किंग करून वाहतुकीचा नियभंग करणाऱ्या वाहनचालकाडून दंड वसूल करण्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.शहरात सुसाट वाहने चालवून स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकाची संख्या वाढली आहे.याच्यावर आकुंश ठेवण्यासाठी वाहतुकीच्या नव्या नियमाला गृहीत धरून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.वाहनचालकांनी वाहतुकीचा नियम मोडल्यास जबरदस्त दंड भरावा लागणार आहे.२०० रुपयांचा दंड भरून सुटका करण्यात येत होती आता मात्र नव्या नियमनानुसार वाहनचालकांना पाच पट म्हणजे हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.( new rules of traffic)

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याकडून २६ हजाराचा दंड वसूल

शहरात सुसाट वाहने चालविणे,डबल,ट्रीपलसीट फिरणे,वाहन परवाना नसताना वाहन चालविणे आशा दुचाकीस्वरांना गुरुवारी चांगलेच महागात पडले असून विनावाहन परवाना दुचाकी चालविणाऱ्या ५ वाहनचालकाकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यांच्याकडे परवाना आहे पण घरी विसरला म्हणून ५०० रुपये दंड घेण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी किंगखान पठाण यांनी सांगितले.गुरुवारी काही तासात ५१ केसेस करण्यात आल्या असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.(Driving without a driving license)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com