Paranda News : महाविद्यालयतील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना तरुणीने घेतला जगाचा निरोप

महाविद्यालयतील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जागेवरच कोसळल्याने भविष्यांचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणीने जगाचा निरोप घेतला.
Varsha Kharat
Varsha Kharatsakal
Updated on

परंडा - महाविद्यालयतील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जागेवरच कोसळल्याने भविष्यांचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणीने जगाचा निरोप घेतला. ही दुदैवी घटना शुक्रवारी (ता. ४) रा. गे. शिंदे महाविद्यालयाच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात घडली.

महाविद्यालयातील वर्षा खरात हि विद्यार्थीनी विज्ञान शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.

त्याच कार्यक्रमात वर्षा मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त करतांना आयुष्यावर बोलत बोलत असतानाच ती अचानक कोसळली यातच तिचा चटका लावणारा मृत्यू झाला. सारेच हळहळले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर आयुष्यांचे चित्र रंगवित असताना भविष्याचे मनोहरी स्वप्न पाहत असताना कार्यक्रमात खळखळून हसणाऱ्या वर्षाने अचानक जगाचा निरोप घेतला. अत्यंत हदयद्रावक घटनेने अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जीवन किती क्षणभंगूर आहे. या दुदैवी घटनेने पुन्हा अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com