Tembhapuri Project
sakal
शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पात शुक्रवारी (ता. १) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात पाणी साचल्याने तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामगार दिनानिमित्त सुट्टी असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील एकूण नऊ तरुण टेंभापुरी प्रकल्प परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी काही तरुण पाण्यात उतरले असता मुरूम माफियांकडून खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडू लागले. सहकाऱ्यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.