esakal | दुर्दैवी घटना : आईचे सरण पेटताच मुलीचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी घटना : आईचे सरण पेटताच मुलीचा मृत्यू 

दु : खाने व्याकुळ झाल्याने मोठी मुलगी चंदरबाई पवार बेशुद्ध झाली. तीला तात्काळ नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा वाटेतच मुत्यू झाल्याची घटना रात्री (ता. २६) घटना घडली.

दुर्दैवी घटना : आईचे सरण पेटताच मुलीचा मृत्यू 

sakal_logo
By
प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी तालुक्यातील शिरुर येथील वृद्ध महिलेची हत्या झाल्यानंतर तिच्या पाचही मुलीने आईच्या अग्नीला बुधवारी (ता. २६) दुपारी चितेला अग्नी दिला. मयत वृद्धेला मुलगा नसल्याने तीच्या पाच मुलीनी चितेला भडाग्नी दिला. हंबरडा फोडत सर्व मंडळी घरी पोहचली. मात्र आईच्या        दु : खाने व्याकुळ झाल्याने मोठी मुलगी चंदरबाई पवार बेशुद्ध झाली. तीला तात्काळ नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा वाटेतच मुत्यू झाल्याची घटना रात्री (ता. २६) घटना घडली.

शिरुर येथील वृद्ध महिला कृष्णाबाई पुंडलिक पडोळे (वय ८५) हिचा मंगळवारी (ता. २५) दुपारी अज्ञात मारेकऱ्यांनी तिचा घरात घुसून तिचा गळा आवळून खून करून तिच्या अंगावरील जवळपास एक लाखाचे दागिणे लंपासस केले होते. कृष्णाबाई पडोळे ही आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाठिमागे असलेल्या घरी एकटी राहत होती. ही घटना सायंकाळी उघडकीस आल्याने घटनास्थळाला गावकऱ्यांनी भेट दिली. या घटनेची माहिती उमरी पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व उमरी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

 हेही वचा -  दिल्लीतील घटनेला सरकार जबाबदार, जेएनयूच्या विद्यार्थ्याचा आरोप

उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल

कृष्णाबाई पडोळे हिला पाच मुली असुन या पाचही मुली विवाहीत आहेत. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू काही वर्षापपूर्वीच झाला होता. ता. २६ फेब्रुवारी रोजी उमरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृष्णाबाई पडोळे हिच्या पार्थीवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठी मुलगी श्रीमती चंदरबाई पवार रा. बेटकबिलोली (ता. नायगाव) हल्ली मुक्काम नमस्कार चौक नांदेड येथील ती असुन आईच्या दुखाचा विरह सहन न झाल्याने ती आईच्या चितेला अग्नी देताच ती बेशुध्द झाली. लगेच तिच्या नातेवाईकांनी तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. 

चंदरबाई पवार हिच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार

कृष्णाबाई पडोळे हिच्या खूनप्रकरणी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. २६) रात्री संशयीत दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी  सुनिल पाटील यांनी दिली. या घटनेचा तपास सुरू असतानाच तिच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाल्याने पुन्हा शिरूर गावावर शोककळा पसरली आहे. चंदरबाई पवार हिच्या पार्थीवावर गुरूवारी (ता. २७) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.   
 

loading image
go to top