praik doiphode
sakal
बीड - सुटीच्या दिवशी आईने मित्रांसोबत खेळायला जाऊ न दिल्याच्या रागातून एका पंधरावर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केज शहरात घडली.
केवळ वीस दिवसांच्या अंतराने एकाच शाळेतील व एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने शिक्षक व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रतीक रामेश्वर डोईफोडे (रा. समर्थनगर, केज) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.