two youth death in bike accident
sakal
कन्नड - तालुक्यातील कन्नड–वैजापूर रस्त्यावर बनशेंद्रा–सिरजगाव दरम्यान दुचाकी लिंबाच्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १२) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. शुभम रमेश सोनवणे (वय २३) व रतन बाळू गायकवाड (वय २१, दोघेही रा. रेल–कनवकावती, ता. कन्नड) अशी मृत तरुणांची नावे आहेत.