उदगीर - तालुक्यातील डोंगरशेळकी येथे घडलेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवारी (ता.३०) रोजी सकाळी सुमारे पावणेसहा वाजता मौजे डोंगरशेळकी येथील धोंडूतात्या मंदिराजवळील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी संजीव बाबुराव केंद्रे (वय ५६, व्यवसाय शिक्षक) यांनी फिर्याद दिली आहे. सदर महीला त्या परिसरात फिरत असताना, महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम एच२४ बीआर ७०१९) भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवित असलेल्या चालकाने त्यांच्या आई रशिकाबाई बाबुराव केंद्रे (वय-७५) यांना जोरदार धडक दिली..या धडकेत रशिकाबाई गंभीर जखमी झाल्या असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित ट्रॅक्टर चालक रामेश्वर गिरीधर मुंडे (रा. डोंगरशेळकी, ता. उदगीर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायदा कलमा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.