Pachod Accident : लग्नपत्रिका वाटप करणारा युवक पाचोडला अपघातात ठार

नातेवाईकाच्या लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीने बीडला जाणाऱ्या युवकाचा पिकअपने जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली.
Anil yadmal

Anil yadmal

sakal

Updated on

पाचोड - नातेवाईकाच्या लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी पांढरी पिंपळगाव, (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथून दुचाकीने बीडला जाणाऱ्या युवकाचा समोरून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता. पैठण) जवळील अमृत हॉटेलसमोर गुरुवारी (ता. ३०) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. अनिल भिमा यदमाळ, रा. रजापूर, (ता. पैठण) ह. मु. पांढरी पिंपळगाव, (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com