Sairaj Bidave
sakal
- संतोष निकम
कन्नड - वाढदिवसाचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नियतीने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना हतनूर (ता. कन्नड) येथे घडली. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेजवळ उड्डाणपुलाच्या सुरुवातीला दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात साईराज योगेश बिडवे (वय-२०) या महाविद्यालयीन तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (ता. 8 ) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.