Rickshaw Accident : मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला; रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर

मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली.
Raju jagdhane

Raju jagdhane

sakal

Updated on

- बाळासाहेब काळे

करमाड - मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवार (ता. २९)रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com