निलंगा - तालुक्यातील तळीखेड पाटी जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी कार वाहनाने एका मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोन सख्ख्या भावांतील एकामोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. १७ रोजी घडली आहे.
दत्ता सुरेश कदम (वय-35 वर्ष) रा. सावरी, ता. निलंगा असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून लहान भाऊ दिगंबर सुरेश कदम असे जखमी झालेल्या लहान भावाचे नाव आहे. हा अपघात लातूर -जहेराबाद महामार्गावर दुपारी रस्त्यावरील पडलेला मोठा खड्डा चुकवण्यात घडला. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील सावरी येथील दत्ता सुरेश कदम व दिगंबर सुरेश कदम हे दोन सख्खे भाऊ असून हे दोन्ही भाऊ हैद्राबाद येथे नौकरी करत होते, सावरी गावात पंढरपूरची पालखी येते त्यामुळे गावात जेवणाचे कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
त्यामुळे ते कांही दिवसांपूर्वी आपल्या मुळ गावी म्हणजे सावरी येथे आले होते. कार्यक्रम झाला. त्यानंतर दोन्ही भाऊ हे एलआयसीचा हप्ता भरून घ्यावा व नंतर आपल्या कामाला हैद्राबादला जावं यासाठी ते हप्ता भरण्यासाठी निलंग्याला येत होते.
मात्र निलंगा मार्गे औरादला जाणारी भरधाव वेगाने सियाज नावाच्या कारने लातूर - जाहीराबाद महामार्गवरील तळीखेड पाटीला खड्डा चुकवण्याच्या नादात मोटारसायकल स्वारांना जोराची धडक दिली. यातील मोटारसायकल वरील मोठा भाऊ दत्ता सुरेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
तर लहान भाऊ दिगंबर सुरेश कदम यांचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही भावना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले असून मयतास निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत अंत्यविधी त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले.
या अपघातात तिघे जखमी झाले असून अतूल परमेश्वर सूर्यवंशी (वय-३५) रा. माकणी-थोर, रूक्मिणी मारूती सारखे (वय-२३) रा. कासार बालकूंदा हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना लातूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.