

नांदेड : वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात महिला मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर तिघेजण बचावले असून मृतांमध्ये दोन १८ वर्षांच्या युवती आहेत.