Latur Accidentsakal
मराठवाडा
Latur Accident: लातूर-उमरगा महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील तीन तरुण ठार
Accident News: किल्लारी, लातूर भागात भरधाव कारच्या धडकेत तीन तरुण दुचाकीवरील ठार झाले. सोमनाथ, अभिषेक आणि दिगंबर या तरुणांचे पार्थिव गावात अंत्यसंस्कार करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.
किल्लारी (जि. लातूर) : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील तीन तरुण ठार झाल्याची घटना लातूर-उमरगा महामार्गावर रविवारी (ता. २४) रात्री उशिरा घडली. सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय २२), अभिषेक शाहूराज इंगळे (२३) आणि दिगंबर दत्ता इंगळे (२७) अशी मृतांची नावे आहेत.