dnyaneshwar waghmare
sakal
पाचोड (ता. पैठण) - येथून काम आटोपून आपल्या गावी परतणाऱ्या दोन मित्रांच्या दुचाकीची समोरासमोर उसाच्या बैलगाडीशी धडक झाली. या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. केकत जळगाव ते कोळीबोडखा रस्त्यावर शुक्रवारी (ता. २) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.