Latur Accident : आई-वडिलांसह मुलगा अपघातात ठार; दुचाकी-क्रुझरची समोरासमोर धडक
Road Accident : निलंगा तालुक्यातील हलगरा पाटीजवळ दुचाकी व क्रुझरची समोरासमोर धडक होऊन काशीनाथ कांबळे, त्यांच्या पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. कांबळे कुटुंबीय नातेवाइकांच्या कार्यक्रमावरून परतत होते.
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हलगरा पाटीजवळ शनिवारी (ता. १७ ) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी व क्रुझर वाहनाची समोरासमोर धडक होऊन आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार झाला.