
पारध : पद्मावती( ता. भोकरदन) येथील घरकुलाच्या बांधकाम सुरु असतांना एका चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 16) दुपारी घडली. याविषयी माहिती अशी की, पद्मावती येथील मदन गंगाराम साळवे हे कामधंदा निमित्त आपल्या कुटूंबासह पुणे येथे गेल्या काही वर्षपासून राहतात. परंतु यंदा गावाकडे घरकुल मंजूर यादीत नाव आल्यामुळे गावाकडे घराचे बांधकाम करण्यासाठी कुटूंबासह काही दिवसापूर्वी पद्मावती येथे येऊन घरकुलाचे बांधकाम सुरु केले होते, बांधकाम जवळपास अंतिम टप्प्यात आलेले असताना सोमवार (ता..१६ ) दुपारी १२ वाजेच्या सुमारास यश मदन साळवे( वय 14) हा बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला असता, तात्पुरत्या स्वरूपात जोडलेल्या वीजचा जबरदस्त धक्का लागून यश साळवे गंभीर जखमी झाला.