sharnappa mudkanna and sushma mudkanna
sakal
मुरूम - संगारेड्डी जिल्ह्यातील (तेलंगणा) जहिराबाद बायपास रोडवर हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर झालेल्या भीषण कार अपघातात मुरूम येथील ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरणाप्पा सिद्रामप्पा मुदकण्णा (ऊर्फ शरणु अण्णा) व त्यांच्या पत्नी सौ. सुषमा मुदकण्णा यांचे मंगळवारी (ता. २४) रोजी दुःखद निधन झाले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच मुरूम शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे.