Sand Pit Accident : वडिलांना भेटायला आलेल्या भूषणचाही गुदमरून झाला मृत्यू; पासोडी येथील प्रकार, आईचा आक्रोश मन सुन्न करणारा
Tragic Accident : शालेय सुट्टीतील भूषण वडिलांना भेटण्यासाठी आपल्या आई आणि बहिणीसह पासोडी येथे आले होता. वाळूखाली दबून त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे आईच्या आक्रोशाने मन सुन्न करणारी परिस्थिती निर्माण झाली.
जाफराबाद : शाळेत दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सुटीत आई आणि बहिणीसह वडिलांना कामावर भेटावयास आलेल्या भूषणला आपला जीव गमवावा लागला. पासोडी (ता. जाफराबाद) येथे शनिवारी पहाटे साडेतीनला वाळूखाली दबून वडिलांसोबत भूषणचाही मृत्यू झाला.