पाचोड - पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडून आल्याची घटना पाचोड - पैठण रस्त्यावर राहटगाव - नानेगाव (ता. पैठण) शिवारात मंगळवारी (ता.१७) दुपारी उघडकीस आली..त्यासंबंधी अधिक माहिती अशी की, दावरवाडी (ता. पैठण) येथील सुशांत संतोष भोजने (वय २० वर्षे) हा युवक पोलीस दलात भरतीची तयारी करीत होता.तो अनेक दिवसांपासून धावण्याचा सराव करत होता. दररोज तो पहाटे पाचोड - पैठण रस्त्याने धावत असत.सोमवारी (ता.१६) पहाटे चार वाजेच्या सुमारास तो पाचोड - पैठण रस्त्यावर धावण्यासाठी गेला असता घरी परतलाच नाही. त्याच्या कुंटुंबियानी दुपारपर्यंत त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडून न आल्याने त्याचे चुलते परमेश्वर बबन भोजने (वय ३५ वर्ष) यांनी दुपारी पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्यात सुशांत भोजने बेपत्ता झाल्याची तक्रार दिली..यावरून पोलिसांनी सुशांत भोजने बेपत्ता असल्याची नोंद घेऊन या घटनेचा तपास सुरु केला. मात्र तो सापडून आला नाही. अखेर पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधले असतात तो राहटगाव - नानेगाव शिवारातच असल्याचे दिसून येत होते. एवढेच नव्हे तर त्याच्या मोबाईल क्रमांकावर पूर्णतः घंटी जात होती. परंतु तो कॉल घेत नसल्याने सर्वजण काळजीत पडले होते..नंतर मोबाईलमधील चार्जिंग संपल्याने सदरील मोबाईल क्रमांकावर रिंग जाणेही बंद झाल्याने त्याचा शोध घेणे जिकरीचे झाले होते.या घटनेला अवघे दोन दिवस उलटून गेले असल्याने सर्वांची चिंता वाढली होती. अखेर मंगळवारी (ता.१७) दुपारी पाचोड - पैठण रस्त्यालगत पडीत जमिनीवर गुरे राखत असताना त्यांना झुडपातून काही तरी सडल्याची दुर्गंधी येत होती.त्यामुळे त्या गुरे राखणाऱ्या व्यक्तींनी झुडपाजवळ जाऊन पाहणी केली असता एक मृतदेह त्या झुडपात दिसून आला. त्यांनी तातडीने पाचोड पोलिसांसह दावरवाडी व परिसरातील अनेकांना माहीती देऊन समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केला. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व सदरील मृत व्यक्तीची बारकाईने पाहणी केली असता तो सुशांत भोजनेच असल्याचे दिसून आले..संबंधित मृतदेह पूर्णतः फुगून ते कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने मृतदेह झूडपाबाहेर काढून बारकाईने पाहणी केली असता सदर घटना ही एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरील युवकाचा मृतदेह रस्त्यावरून उडून तो झुडपात जाऊन पडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे..सदरील घटना ही पाचोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रापासून शंभर -दीडशे फूट दूर येत असल्याने पैठण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. यासंबंधी पाचोड पोलीस ठाण्यात मिसिंग दाखला असली तरी या घटनेचा तपास पैठण करत आहे. या युवकाने रंगविलेले स्वप्न क्षणात भंगल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पैठण पोलीस करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.