Murud Crime : अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाला संपविले

अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून संपविल्याची घटना करकट्टा येथे घडली.
Sharad Ingale
Sharad Ingalesakal
Updated on

मुरुड - अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना करकट्टा, ता. लातूर येथे रविवार ता. 30 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

आरोपींना अटक करेपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेत मयताच्या नातेवाईकांनी जवळपास चार तास प्रेत जाग्यावरून हलू दिले नाही. संशयित आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची शंका पोलिसांना असून मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

करकट्टा, ता. लातूर येथील खडी केंद्रावर मुकादम म्हणून काम करणारा मयत शरद प्रल्हाद इंगळे (वय-35 वर्षे) याचे गावातील एका महिले सोबत अनैतिक संबंध होते. मयत व्यक्ती व सदरील महिला दोघेही विवाहित आहेत. तीन महिन्यापूर्वी एकमेकांसोबत राहण्यासाठी त्यांनी गावातून पलायनही केले होते. नातेवाईकांनी त्यांना समजूत घालून परत आणले.

या महिलेच्या मुलांना व नातेवाईकांना हा प्रकार आवडला नव्हता यामुळे राग मनात धरून आरोपी महिलेचा मुलगा, पती व याच महिलेचा एक अल्पवयीन मुलगा यांनी रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मयत काम करत असलेल्या खडी केंद्रावर जाऊन शरदच्या डोक्यात व शरीरावर धारदार शस्त्राने वार केले.

यानंतर मोटरसायकल वर बसून रक्ताने माखलेल्या कपड्यासह पळून जात असताना गावातील एका व्यक्तीने पाहिले. थोडेसे पुढे आल्यानंतर या व्यक्तीस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शरद इंगळे दिसला त्यांनी तात्काळ मयताच्या नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली.

घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी मुरुडचे सपोनी अशोक उजगरे, पीएसआय नागरगोजे यांच्यासह पोलीस दाखल झाले मात्र रक्तस्त्राव झाल्याने मयत जागेवरच मृत्युमुखी पडला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सदरील महिलेच्या एका मुलासह नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

मात्र प्रत्यक्ष खुनात सहभागी असलेल्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत जागेवरून हलू देणार नाही अशी भूमिका मताच्या नातेवाईकांनी घेतली. जवळपास चार तास प्रेत जागेवरच होते यानंतर नातेवाईकांची समजूत घालून पोलिसांनी प्रेत शिवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणले.

मुरुड पोलिसांकडून संशयित आरोपींच्या नातेवाईकाकडे चौकशी करण्यात येत असून घटनेत कोण कोण सहभागी होते याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मुरुड पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com