innova car accidentsakal
मराठवाडा
Innova Car Accident : उदगीरला इनोव्हाचा भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी
भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या मधील डिव्हाडयरला जोराची धडक दिल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला.
उदगीर - उदगीर-नळेगाव रोडवर भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या मधील डिव्हाडयरला जोराची धडक दिल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात एकजण जागेवरच ठार झाला असुन तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
