करमाड - मुलाला दवाखाना करून घरी परतत असताना पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील सटाणा पाटी येथे शुक्रवारी (ता. २०) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली पवन उदलसिंग गुसिंगे (वय-३८) असे अपघात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे या घटनेत मूलगा सचिन पवन गुसिंगे (वय-१२) थोडक्यात बचावला.