Accident News : फर्दापूरजवळ भीषण अपघात! वऱ्हाडाच्या गाडीत एक ठार, नऊ जखमी
Road Accident : फर्दापूरजवळ लग्नहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.
फर्दापूर : लग्नसोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझरला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, नऊ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. दहा) दुपारी चारच्या सुमारास घडली.