Maharashtra Accident : ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू; २ जण गंभीर, 8 किरकोळ जखमी
Accident News : जालना-बीड महामार्गावर सुखापुरी फाट्याजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल्स व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मायलेकींचा मृत्यू, तर ८ जण जखमी झाले.
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. बीडवरून जालन्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडली.