esakal | नांदेड : जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

नांदेड : जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 29 फौजदारांचा समावेश आहे. या बदल्यांचा आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या स्वाक्षरीने बुधवारी (ता. 4) काढण्यात झाला.

येत्या काळात विधानसभा निवडणूक असल्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेत व ज्या घटकात तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या व जिल्ह्यात नवीन आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेल्यामध्ये :

पोलिस निरीक्षक : चंद्रशेखर चौधरी (शिवाजीनगर- नियंत्रण कक्ष), अनंता नरुटे (नियंत्रण कक्ष- शिवाजीनगर), चंद्रकांत गुंगेवाड (मरखेल ते नियंत्रण कक्ष), शिवाजी डोईफोडे (कंधार ते नियंत्रण कक्ष), विकास जाधव ( नियंत्रण कक्ष- कंधार), रामराव गाडेकर (हदगाव- नियंत्रण कक्ष), अवदूत कुशे ( नियंत्रण कक्ष- हदगाव), रविंद्र बोरसे (हिमायतनगर ते नियंत्रण कक्ष), भगवान कांबळे ( नियंत्रण कक्ष ते हिमायतनगर), अशोक अनंत्रे  (नियंत्रण कक्ष- उमरी) आणि ज्ञानेश्‍वर हरणे (बारड- नियंत्रण कक्ष).

सहाय्यक पोलिस निरीक्षक : आदित्य लोणीकर ( मरखेल ), विश्‍वांभर पल्लेवाड (उमरी ते नियंत्रण कक्ष), विनोद कांबळे ( कुंडलवाडी ते जिवीशा ), करीम पठाण (ग्रामिण ते कुंडलवाडी), शरद मरे ( कुंटूर ते सायबर सेल), सुरेश मान्टे (विमानतळ- कूंटुर), बालाजी भंडे ( सोनखेड- जिवीशा), सुधूकार आडे ( नियंत्रण कक्ष- सोनखेड), दिलीप इंगळे ( धर्माबाद- हिमायतनगर), संदीप कामत ( भाग्यनगर- नियंत्रण कक्ष), रमाकांत पांचाळ ( पोलिस कल्याण- स्थागुशा), अशोक जाधव ( जिवीशा- स्थागुशा), सुनील नाईक ( वाहतुक शाख-  स्थागुशा), प्रल्हाद गीते ( नियंत्रण कक्ष- इतवारा), जयसिंग ठाकूर (नियंत्रण कक्ष- वजिराबाद), बाळासाहेब नरवटे ( लोहा), संगमनाथ परगेवार ( देगलुर),  विश्‍वजीत कासले ( नांदेड ग्रामिण), सुशांत किनगे ( मुदखेड) आणि महादेव मांजरमकर पोलिस कल्याण विभागाला. 

फौजदार :  लक्ष्मण बोनवाड (मुदखेड - नियंत्रण कक्ष), अनिल कांबळे ( उमरी - नियंत्रण कक्ष), गजानन कागने ( हिमायतनगर- नियंत्रण कक्ष), अमृता केंद्रे ( भाग्यनगर- नियंत्रण कक्ष), साईनात सुरवसे ( उमरी- नियंत्रण कक्ष), बाबू खेडकर ( बिलोली - नियंत्रण कक्ष), मनिषा पवार ( देगलुर - शिवाजीनगर), गणेश कराड ( देगलुर - धर्माबाद), दिगंबर जामोदकर ( अर्धापूर- किनवट), दत्तात्र्य काळे ( शिवाजीनगर- इतवारा), स्वाती कावळे ( ग्रामिण- नियंत्रण कक्ष), शिवानंद स्वामी ( इतवारा- मुदखेड), राजाभाऊ जाधव ( ग्रामिण- भाग्यनगर), गोपीनाथ वाघमारे ( शिवाजीनगर- मुक्रमाबाद), नंदकिशोर कांबळे ( माळाकोळी- देगलुर), बाळू चोपडे ( विमानतळ -  इतवारा), राणी भोंडवे ( मुक्रमाबाद - नियंत्रण कक्ष), सोनाबाई कदम ( ग्रामिण- शिवाजीनगर), दशरथ आडे ( इतावार-  विमानतळ), पूनम सुर्यवंशी ( भोकर - देगलुर), कपील आगलावे ( शिवाजीनगर- अर्धापूर), विक्रम विटूबोणे ( इस्लापूर - हदगाव), रहीम चौधरी ( इतवारा- उमरी), राजीव म्हात्रे ( हदगाव - ग्रामिण), असद शेख ( मुखेड-  ग्रामिण), गणपती चिते ( किनवट - मुखेड), अजीत बिराजदार ( कुंटूर- मरखेल), दिनेश येवले ( मरखेल- कुंटूर), आणि शालीनी गजभारे इतवारा ते भोकर.

loading image
go to top