अंगाचा थरकाप उडविणारी घटना : हिंगोली, जिंतूर व औंढाचे प्रवाशी सुखरुप; चालत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

रंगनाथ गडदे
Friday, 8 January 2021

या बसमध्ये बारा प्रवाशी होते. हे  सर्व प्रवाशी सुखरुप असून त्यांचे सामानमात्र बसमध्ये जळून खाक झाले. हा बर्नींग बसचा थरार शुक्रवारी (ता. आठ) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. 

चारठाणा ( ता. जिंतूर, जिल्हा परभणी ) : औरंगाबाद जिंतुर महामार्गावरील मानकेश्वर (चारठाणा) पाटीजवळ पुण्याहून हिंगोलीकडे येणाऱ्या खासगी चासलत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. परंतु चालकांच्या सावधानतेमुळे मोठा अन्रथ टळला. या बसमध्ये बारा प्रवाशी होते. हे  सर्व प्रवाशी सुखरुप असून त्यांचे सामानमात्र बसमध्ये जळून खाक झाले. हा बर्नींग बसचा थरार शुक्रवारी (ता. आठ) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. 

पूणे येथून हिंगोलीकडे येत असलेल्या खासगी ट्र्ॅव्हल्सने अचानक पेट घेतला. या गाडीत बारा प्रवाशी प्रवास करत होते. बसच्या इंजिनला आग लागताच चालकाने आपली बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. चालकाच्या चतुराईने गाडीतील सर्व बाराही प्रवाशी कोणतीही इजा होऊ न देता बाहेर काढण्यात यश मिळाले. यामुळे मोठी जिवीत हानी टळली. ही घटना सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली.

जळीतप्रकरणी गुन्हा दाखल

स्थानिक नागरिकानी पोलिसांशी संपर्क साधून अग्नीशमन दलाला बोलावले. अग्निशामक घटनास्थळी पोहचेपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाली. पुण्याहून हिंगोलीकडे जाणारे ट्रॅव्हल्स गाडी (क्र.एम एच २० डि. डि.०५२९). यातील प्रवासी दिपक गणेश मोरे (वय २१), रा. औढानागनाथ, श्री .मदन, श्री. राठोड (वय २३) रा. कवठेतांडा ता. औढानागनाथ, गणेश अंकुश वाघ (वय २६) ता. जिंतुर, सचिन दादाराव मोरे रा. हिंगोली  येथील असल्याचे कळाले. दरम्यान या घटनेत ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर बऱ्याच उशिराने पोलिस घटनास्थळी पोहचले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार, फौजदार प्रदिप अल्लापुरकर हे घटनास्थळी आले. सदरील घटनेचा पोलिसांनी पंचनामा कोेला असून या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात जळीतप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन- प्रल्हाद कांबळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traumatic events Passengers of Hingoli Jintur and Aundha safe hingoli bus burning news