- धनंजय शेटे
भूम - भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिक्कीचा पत्रा लागल्यामुळे एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील ईट येथे घडली आहे .
आक्का ट्रॅव्हल्सची एक बस शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वाशी येथून ईट मार्गे पुण्याकडे जात होती. या वेगाने असणाऱ्या ट्रॅव्हल्स गाडीची डिग्गी उघडी असल्याने मागील जाणाऱ्या दुचाकीस्वराला त्या डिग्गीचा पत्र्याचा जोराचा मार लागल्याने प्रवीण शिवाजी भोसले (वय- १९) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल आप्पा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.