बापरे! ट्रॅव्हल्सचा अपघात एवढा भयानक? (वाचा कुठे घडलाय)

कमलेश जाब्रस
बुधवार, 25 डिसेंबर 2019

माजलगांव, (जि. बीड) : तालुक्यातील गंगामसला येथील अजित नॅशनल स्कुलसमोर झालेल्या कार - ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 24) रात्री अकरा वाजता घडली आहे.

माजलगांव, (जि. बीड) : तालुक्यातील गंगामसला येथील अजित नॅशनल स्कुलसमोर झालेल्या कार - ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 24) रात्री अकरा वाजता घडली आहे.

हेही वाचा- बीड जिल्ह्यात बस-जीपच्या धडकेत तीन ठार; 15 जखमी

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग 61 कल्याण ते विशाखापट्टणम हा जलद गती मार्ग झाल्यामुळे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर परभणी, नांदेड येथून पुणे, मुंबई साठी ट्रॅव्हल्सने प्रवाशी वाहतूक होते. याच महामार्गावरून परभणी जिल्ह्यातील विजय ज्ञानेश्वर कानडे (वय 24 वर्षे रा. पिंपळगांव ता. जिंतूर), रूपाली विनायक जावळे (24 वर्षे रा. शिवाजीनगर, परभणी) व विनायक दत्तात्रय जावळे (58 वर्षे रा. शिवाजीनगर, परभणी) हे तिघेजण परभणीकडे स्विफ्ट डिझायर (क्रमांक एम. एच. 14 जी. यु. 2731) ने जात असतांना समोरून येणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या जिजाउ ट्रॅव्हल्स ( क्रमांक एम. एच. 22 एफ. 8899) च्या आपघातात विजय ज्ञानेश्वर कानडे व रूपाली विनायक जावळे यांचा मृत्यु झाला तर विनायक दत्तात्रय जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य आहेत ते गंभिर जखमी झाले होते.

क्लिक करा- कर्ज घेऊन शिकले अन्‌ पहिल्या प्रयत्नात न्यायाधीश बनले 

पोलिसांची तत्परता

पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातून वरील तिघांना माजलगांव येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. विनायक जावळे यांचेवर प्राथमिक उपचार करून बीड येथे हलविण्यात आले होते. मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आहे. दरम्यान गंगामसला परिसरामध्ये मंगळवारी छोटे - मोठे तिन ते चार आपघात घडले आहेत. रात्री झालेल्या या आपघाताने गंगामसला परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत दुसऱ्या ट्रॅव्हल्सने पुणे येथे रवाना करण्यात आले. यावेळी गंगामसला येथील अक्षय सोळंके, सुनिल सोळंके, भालचंद्र सोळंके, कृष्णा सोळंके, पांडुरंग सोळंके, जम्मू पठाण यांचेसह ग्रामस्थांनी मोठी मदत केली.

हे वाचलंत का?- मराठवाड्यातील कित्येक गावांत आज संचारबंदी का? : पहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travels Accident in Beed District : 3 Kill