केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा

देवदत्त काेठारे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे वृक्षांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. काळा छापा डोंगरावर मंगळवारी (ता. 13) हा कार्यक्रम झाला. याप्रंसगी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांभोवती आळे करून गवत स्वच्छ केले. गावाजवळच असलेल्या एका टेकडीचे जातिवाचक नाव बदलून "बर्थ डे हिल' असे करण्यात आले.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे वृक्षांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. काळा छापा डोंगरावर मंगळवारी (ता. 13) हा कार्यक्रम झाला. याप्रंसगी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांभोवती आळे करून गवत स्वच्छ केले. गावाजवळच असलेल्या एका टेकडीचे जातिवाचक नाव बदलून "बर्थ डे हिल' असे करण्यात आले.

याप्रसंगी आमदार प्रशांत बंब म्हणाले, ""हे वृक्षारोपण नव्हे, तर संस्कारांचे बीजारोपणच आहे. वृक्षारोपण करणे, झाडे जगविणे व टिकविणे हे आव्हान आहे.''
याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी यशपाल दिलपाक, गायत्री चेतन केंद्राचे राजेश टाक, भारतीय जैन संघटनेचे पारस जैन, पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश अंभोरे, पोलिस निरीक्षक चंदन इमले, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, प्रकाश चव्हाण, दीपक जोशी, मुख्याध्यापक व्ही. पी. गाडेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच संतोष जोशी यांनी प्रास्ताविक, अविनाश औटे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र महाजन यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, युवक मंडळ, ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trees birthday celebrate