Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर (ता. पैठण) शिवारात मंगळवारी तिहेरी अपघाताची घटना घडली.
Triple Accident

Triple Accident

sakal

Updated on

आडूळ - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर (ता. पैठण) शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाचा मागील टायर फुटल्याने हायवा पलटी झाला. त्यानंतर रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे घसरून एका कारने समोरील दुसऱ्या कारला पाठीमागून धडक दिली. या दोन्ही अपघातांमध्ये चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com