फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात एकाच दिवशी तिन ठिकाणी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. जिनिंग झोपडपट्टीतील १४ वर्षीय मुलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला, तर सांजुळ येथील ३२ वर्षीय युवकाने गळफास घेतला आणि म्हस्ला येथील ३५ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या तिन्ही घटनांची फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद सोमवारी (ता.२९) करण्यात आली आहे.