Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खादगाव शिवारात उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीला महामार्ग पोलिसांनी अटक केली. चोरी केलेले १७० लिटर डिझेल व दो हजार रुपये घेऊन आरोपी फरार झाला होता.
जालना : समृद्धी महामार्गावरील खादगाव (ता.जालना) शिवारातील उभ्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्याला महामार्ग पोलिसांनी अटक केली. आदित्य केशव पंडित (रा. भवानीनगर, जालना) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.