खंजरने मारून ट्रक चालकास लुटले

file photo
file photo

नांदेड : ट्रकचालकास खंजरने जखमी करून त्याच्याकडील साडेतीन हजार रुपये जबरीने अनोळखी तिघांनी पळविले. यावेळी त्यांनी ट्रकच्या काचाही फोडल्या. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी चारच्या सुमारास नविन मोंढा येथील वजनकाट्यावर घडली. जखमी चालकावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

उज्जैन (मध्यप्रदेश) येथून गहू भरून नांदेडला एका व्यापाऱ्याला देण्यासाठी रामकिशन मंगोजी सूर्यवंशी (वय ३५) रा. गुरदाबन ता. नलाखेडा, जिल्हा अगरमलवा (मध्यप्रदेश ) हा आपला ट्रक (एमपी-०७-एचबी-८७९३) घेऊन बुधवारी (ता. २७) पहाटे नविन मोंढा भागात पोहचला. रात्रीची वेळ असल्याने आपला ट्रक वजनकाट्याजवळ उभा करून क्लिनर व तो झोपी गेला. रात्रभर ट्रक चालवत आणल्याने त्यांना लगेच डोळा लागला. बुधवारी सकाळी चारच्या सुमारास दुचाकी (एमएच२६-एएन-७४०६) वर बसुन अनोळखी तीन चोरटे ट्रकजवळ आले. ट्रकच्या कॅबीनवर दगड मारून समोरची काच फोडली. झोपलेले चालक व क्लिनर जागे झाले. यावेळी चोरट्यांनी चालकावर खंजरने जबर वार केला. पैसे द्या म्हणून क्लिनरसह त्याला मारहाण केली. माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणताच खंजरने डाव्या बरगडीच्या खाली मारून चालक रामकिशन सुर्यवंशी याला गंभीर जखमी केले. चालकाच्या खिशातील नगदी साडेतीन हजार रुपये जबरीने काढून घेऊन सोबत आणलेली दुचाकी तिथेच सोडून हे तिघे जण पसार झाले. क्लिनरने विचारपूस करीत चालकास शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरून चोरट्यांनी आणलेली दुचाकी जप्त करून जखमीची विचारपूस करून त्याची तक्रार घेतली. यावरून अनोळखी तिघांवर जबरी चोरीचा व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भोळ करित आहेत. 

नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वारांनी हैदोस घातला आहे. पायी जाणाऱ्या महिला किंवा विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना गाठून त्यांना चाकु, खंजर किंवा तलवार दाखवून त्यांची लुट करणारी टोळी सक्रीय झाली आहे. शहरात वाटमारीच्या अनेक घटना घडत असतांना बुधवारी पुन्हा नविन मोंढा भागात एका ट्रकचालकास खंजडरने मारून लुटले. यामुळे शहरातील सुरक्षा कुचकामी ठरत असल्याचे पहायवयास मिळते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचे नांदेडकरांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com