Parli Vaijnath : वीजतारांना ट्रकचा स्पर्श; दोन मजुरांचा मृत्यू ,परळी तालुक्यातील घटना

कूपनलिका खोदण्यासाठी यंत्रसामग्री असलेल्या वाहनाचा वीजतारांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शहराजवळील वाघबेट (ता. परळी) येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
Beed
Beedsakal

परळी वैजनाथ : कूपनलिका खोदण्यासाठी यंत्रसामग्री असलेल्या वाहनाचा वीजतारांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शहराजवळील वाघबेट (ता. परळी) येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत.

कूपनलिका खोदण्यासाठी ओरिसा राज्यातील सहा जणांचे पथक यंत्रसामग्री असलेला ट्रकसह वाघबेट येथे पथक आले होते. गावातील काम संपल्यानंतर ट्रक शहराकडे येत होता. त्यावेळी वीजवाहक तारांना या वाहनाचा स्पर्श झाला. वाहनात लोखंडी साहित्य असल्याने वीजप्रवाह त्यात उतरला.

Beed
Parali News : परळीत ‘व्हायरल इन्फेक्शन’ची साथ,लहान मुलांचे दवाखाने हाऊसफुल्ल; डेंगीनेही काढले डोकेवर

ट्रकमध्ये सहा मजूर होते. विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण भाजले. गोविंदा धवन सिंग व संदीप डाक्टर असे मृत व्यक्तींची नावे आहेत. जखमी दोन मजुरांवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चालकाच्या निष्काळजीपणाने हा दुर्दैवी अपघात घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी पंचनामा केला असून ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com