
गेल्या आठवडयात कृषी विधेयक पास झाल्यानंतर व हमी भावात वाढ झाल्याने सर्व प्रकारच्या डाळी मध्ये तेजी आली आहे.सर्वात जास्त तूर डाळी मध्ये १४ ते १५ रुपये .प्रति किलो तेजी आली
कनेरगाव नाका (जिल्हा हिंगोली) : गोडतेला पाठोपाठ तुरीच्या डाळीनेही किरकोळ बाजारात शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. गेल्या आठवड्यातच जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचे दर वाढल्यानंतर खाद्यतेल शंभर रुपयांच्यावर पोहोचले होते.
गेल्या आठवडयात कृषी विधेयक पास झाल्यानंतर व हमी भावात वाढ झाल्याने सर्व प्रकारच्या डाळी मध्ये तेजी आली आहे.सर्वात जास्त तूर डाळी मध्ये १४ ते १५ रुपये .प्रति किलो तेजी आली ,तर मुगडाळ मध्ये नऊ ते दहा रुपये प्रति किलो पर्यंत वाढ झाली आहे . इतर डाळीमध्ये चार ते पाच रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.
शुक्रवार (ता.१९) रोजी ठोक बाजारामध्ये ८३०० ते ८५०० असणारी फटका तुवर दाळ कृषी विधेयक पास होताच ९३०० रुपये झाली. तर बुधवार (ता.२३) रोजी ९६०० ते ९७०० रूपयांवर पोहचली मुंगदाळ ७००० ते ७६०० वरून ७५०० ते ८३०० रुपये प्रति क्विंटल झाली. यामुळे किरकोळ बाजारामध्ये फटका तूर डाळीचे भाव ८८ ते ९० रूपयां वरून प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचले आहेत.
हेही वाचा - बापरे, सततच्या पावसाने विहीर २० फुटापर्यंत खचली
सध्या किरकोळ बाजारांमध्ये डाळींचे दर पुढीलप्रमाणे आहेत कंसामध्ये आठवडाभरापूर्वीचे दर दिलेले आहेत.
तुरदाळ फटका ९८-१०० रूपये प्रति किलो (८८-९० रूपये ),तूरडाळ सव्वा नंबर ९५-९६ प्रति किलो ( ७८--८० रूपये ) मुगडाळ ८५ ते ९० रुपये प्रति किलो (७८ ते ८५ रूपये ) मूंगमोगर १०० ते १०५ रुपये प्रति किलो (९० ते ९५ रूपये ) उडीद दाळ ८० ते ८५ रुपये प्रति किलो (७५ ते ८० रुपये ) उडीद मोगर १०० रुपये प्रति किलो (९० ते ९५ रूपये ) मटकी ८५ ते ९० रूपये प्रति किलो (८० ते ८५ रूपये ) बरबटी ७५ ते ८० रुपये प्रति किलो (७२ ते ७५ रूपये )मेथी ८० ते ८५ रुपये प्रति किलो (७५ ते ८० रूपये ) प्रमाणे विकली जात आहे. यावर्षी पावसाने मुग, उडीद या डाळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला देखील महागला आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक अडचणीत आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे