TuljaBhavani Yatra : तुळजादेवीचा यात्रोत्सव उत्साहात; राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी घेतले दर्शन
Tuljapur Temple : तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लाखो भाविकांनी पहाटेपासून दर्शन घेत यात्रोत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.
तुळजापूर : तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा शनिवारी उत्साहात पार पडली. लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्रीपासून भाविकांची गर्दी होण्यास सुरवात झाली होती. मंदिरात पहाटे एक वाजेपासूनच भाविकांचा दर्शनाचा ओघ सुरू झाला होता.