

Tulja Bhavani Temple Introduces ₹1,000 Paid Darshan Facility for Navratri
esakal
तुळजापूर, :तुळजाभवानी मातेचे सशुल्क देणगी दर्शन एक हजार रुपयांचे करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. हा निर्णय नवरात्रोत्सवापुरता असला, तरी आतापर्यंतच्या वेगवेगळ्या दर्शन व्यवस्थेत सर्वांत जास्त रक्कम मंदिर संस्थानने आकारली आहे. संस्थानने शुक्रवारी (ता. नऊ) प्रगटनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ज्या भाविकांना तातडीने दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी सदरची सोय करण्यात आली असून, त्यांना महाद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.