
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचे मंगळवारी (ता. चार) सायंकाळी मंत्रालयात (मुंबई) उच्चस्तरीय समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) सादरीकरण केले.