पुजारी आक्रमक, तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्यासाठी धरणे आंदोलन

तुळजापूरात (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिराच्या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने धरणे आंदोलन महाद्वारात करण्यात आले.
तुळजापूरात (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिराच्या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने धरणे आंदोलन महाद्वारात करण्यात आले.सकाळ

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिर (Tuljabhavani Mata Temple) भाविकांसाठी उघडण्यात यावे, या मागणीसाठी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने महाद्वारासमोर मंगळवारी (ता.१७) धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर (IAS Kaustubh Divegaonkar) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. सर्व पुजारी वर्ग तसेच सेवेधारी, व्यापारी यांच्या मागणीनुसार मंदिर उघडण्यात यावे. तुळजाभवानी मंदिरातील (Tuljapur) विकास कामे करण्यात यावीत. तसेच तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांच्या बाबतीत पुजारी मंडळींची मते ऐकून घेऊन निर्णय घेण्यात यावा. या शिवाय तुळजाभवानी मंदिरातील लाडू घोटाळा तसेच सोने-चांदी घोटाळा (Osmanabad) याबाबत त्रिस्तरीय चौकशी समिती नेमून कार्यवाही व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

तुळजापूरात (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिराच्या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने धरणे आंदोलन महाद्वारात करण्यात आले.
'पंकजा मुंडे या मला भेटल्या, त्या नाराज असल्याचे वाटले नाही'

या संदर्भात मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील, नगरसेवक सुनील रोचकरी, विनोद गंगणे, लालासाहेब मगर, नागेश साळुंके, करण साळुंके, नरेश अमृतराव आदी उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.

तुळजापूरात (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिराच्या तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने धरणे आंदोलन महाद्वारात करण्यात आले.
नांदेडमधून निघणार मूक मोर्चा, संभाजीराजे राहणार उपस्थित

तालुक्यातील, शहरातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक अंतर पाळणे, मास्क बांधणे यासह विविध प्रकारची काळजी घेऊन जनतेच्या प्रश्नासाठी बाहेर पडणार आहे. तुळजापूर शहरातील पुजारी, व्यावसायिक यांचे व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाले आहेत. मी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांना निवेदन दिले आहे. मंदिर उघडावे, अशी मागणी केली आहे.

- मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री, तुळजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com