
धाराशिव: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर जुलैमधील सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीला शनिवारी (ता. २१) सकाळी दहापासून सुरवात होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या व्यवस्थापकांतर्फे देण्यात आली.