Tuljapur News: तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीची अफवा असून, सर्व तलवारी सुरक्षित असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. या तलवारी शारदीय नवरात्र, शिवजयंतीसारख्या धार्मिक विधींमध्ये पूजेसाठी वापरल्या जातात.
तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील तलवार सुरक्षित असून नैमित्तिक पूजा, धार्मिक विधीवेळी वापर होतो, असे स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे. मंदिरात धार्मिक विधीसाठी वापरात येणारी एक तलवार चोरीला गेल्याची चर्चा १६ जूनदरम्यान होती.