
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात आराध्यसेवा करण्यासाठी आगामी तारखांची नोंदणी करण्यास मंदिर समितीने तूर्त स्थगिती दिली आहे. मंदिर परिसराचे बांधकाम सुरू झाल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.आराध्यसेवेच्या नोंदणीसाठी सध्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना तातडीची म्हणून नोंदणी केली जात आहे. परंतु, पुढील कालावधीसाठी नोंदणी मागणाऱ्यांना ती मिळत नाही.