tuljabhavani temple donation box
sakal
तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दानपेटीत एखाद्या भाविकाकडून अनावधानाने वस्तू पडल्यास ती परत मिळणार नाही. तसा ठराव यापूर्वीच झाला आहे, असे मंदिर संस्थानने पुण्यातील एका भाविकाला काही दिवसांपूर्वी कळविले आहे. यानिमित्त सुमारे आठ वर्षांपूर्वी झालेल्या ठरावाची माहिती समोर आली आहे.