Tur Crop : तुरीच्या उत्पन्नाचा उतारा घसरला! राशीला सुरवात; प्रारंभीच्या टप्प्यात मिळतोय चांगला दर
Kharif Season : उमरग्यात तुरीच्या काढणीला सुरवात झाली असून, प्रारंभीच्या टप्प्यात चांगला दर मिळत असला तरी, परतीच्या पावसाचा आणि किडीचा हल्ला तुरीच्या उत्पन्नावर परिणाम करीत आहे. शासनाने तुरीसाठी सात हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.
उमरगा : खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तूर पिकाच्या काढणीला काही मोजक्या भागांत सुरवात झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. परतीच्या पावसाचा दणका, अळ्या, किडीचा मारा यामुळे तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.