esakal | हिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जिल्ह्यातील हळद मार्केटमध्ये दररोज हजारो क्‍विंटल हळदीची आवक होत आहे. मात्र, एप्रिल महिण्यापासून भावात दररोज घसरण सुरू आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे मसाले, औषधी, सौदर्य उत्पादने आदीं कारखाने बंद राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या खरेदीदाराकडून हळदीला मागणी नसल्याचे जाणकार सांगत आहेत.

हिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्‍ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या दरात घसरण सुरुच आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या खरेदीदाराकडून खरेदी बंद झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात हळदीच्या दरात दोन ते अडीच हजार रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

कमी पाण्यात किफायतशीर उत्‍पादन मिळत असल्याने जिल्‍ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळले आहेत. दरवर्षी हळद लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. मागच्या वर्षी जिल्‍ह्यात ३६ हजार २९९ हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली होती. 

हेही वाचाcovid-19 : पुन्हा मुंबई कनेक्शन; हिंगोलीत आणखी चौघे पॉझिटिव्ह

उत्‍पादकता वीस क्‍विटंलपर्यंत वाढली

लागवडीच्या सुधारीत पद्धती तसेच काटेकोर पीक व्यवस्‍थापनामुळे हळदीच्या क्षेत्रासोबतच एकरी उत्‍पादकता वीस क्‍विटंलपर्यंत वाढली आहे. हिंगोली जिल्‍ह्यात हिंगोली, वसमत, जवळा बाजार, सेनगाव बाजार समित्यातंर्गत हळद मार्केट विकसीत झाले आहे. शेतकरी उत्‍पादक कंपन्या हळद खरेदी करत आहेत.

चार ते पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा भाव

 यावर्षी लॉकडाउनमुळे मसाले, औषधी, सौदर्य उत्पादने आदीं कारखाने बंद राहिले आहेत. मोठ्या खरेदीदाराकडून हळदीला मागणी नाही. सध्या हळद मार्केटमध्ये दररोज हजारो क्‍विंटल हळदीची आवक होत आहे. मात्र, एप्रिल महिण्यापासून दररोज घसरण सुरू आहे. सध्या चार ते पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटल हळदीला भाव आहे. गतवर्षी सरासरी सहा ते सात हजार रुपयापर्यंत हळदीला भाव होता. उत्‍पादकाला मात्र यावर्षी नुकसान सहन करावे लागत आहे. 


मोठ्या खरेदीदाराकडून मागणी नाही

हळद मार्केटमध्ये दररोज दोन ते अडीच हजार क्‍विंटल हळदीची आवक होत आहे. परंतु, मोठ्या खरेदीदाराकडून मागणी नाही. त्यामुळे दर चार हजार रुपयापर्यंत कमी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.
-एस. एन. शिंदे, सचिव, बाजार समिती वसमत


ऐन हंगामात घसरण 

हळदीच्या उत्‍पादन गुणवतेत वाढ झाली. परंतु, यावर्षी लॉकडाउनमुळे हळदीवर आधारित कारखाने बंद राहिले. मागणी कमी झाल्याने ऐन हंगामात घसरण झाली आहे. त्‍यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 
-प्रल्‍हाद बोरगड, सूर्या शेतकरी उत्‍पादक कपंनी, सातेफळ

येथे क्लिक करालॉकडाउनमुळे कापड व्यावसायिक हतबल

नगदी पीक म्हणून पसंती

हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्यासाठी केला जातो. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्येही उपयोग केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो असे जाणकार सांगतात. त्यामुळे हळदीला मोठी मागणी असते. शेतकरी हळद पिकाला नगदी पीक म्हणून पसंती देतात. मात्र,सध्या हळदीच्या भावात घसरण झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. 

loading image
go to top