esakal | कोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर! परभणीच्या सराफा बाजारातील चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरवर्षी कोट्यावधीच्या घरात होणारी जिल्ह्यातील सराफी बाजाराची उलाढाल यंदा मात्र लाखावरच आली असल्याने सराफा व्यापाऱ्यांची कमाई करण्याची संधी हुकली आहे. असे असतांनाही आगामी काळात सोन्याला खरच सोन्यासारखे दिवस येतील अशी शक्यता सराफ व्यापारी वर्तवित आहेत.

कोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर! परभणीच्या सराफा बाजारातील चित्र

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असतो. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला नाही. कारण कोरोना विषाणु संसर्गाचा विपरित परिणाम बाजारपेठेवर दिसून आहे. दरवर्षी कोट्यावधीच्या घरात होणारी जिल्ह्यातील सराफी बाजाराची उलाढाल यंदा मात्र लाखावरच आली असल्याने सराफा व्यापाऱ्यांची कमाई करण्याची संधी हुकली आहे. असे असतांनाही आगामी काळात सोन्याला खरच सोन्यासारखे दिवस येतील अशी शक्यता सराफ व्यापारी वर्तवित आहेत.

कोरोना विषाणु संसर्गाने सर्वच क्षेत्रातील आर्थिक गणिते कोलमडली आहेत. अनेक व्यवसाय बंद पडले तर काही व्यवसायांनी आपल्या शाखा बंद करून संभाव्य नुकसानीपासून स्वताचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम सोन्या चांदीच्या बाजारपेठतही दिसून आला. परभणीच्या सराफा बाजारपेठेत दरवर्षी दसऱ्याला सोन्याच्या खरेदीची उलाढाल ही कोट्यावधी रुपयांच्या घरात असते. त्यामुळे दसऱ्या सणावर सर्वच सराफा व्यापाऱ्यांचे लक्ष केंद्रीत होते. यंदाही सलग तीन ते चार महिणे व्यापार बंद राहील्याने यंदाच्या दसऱ्यातून त्याची थोडी बहुत भरपाई करू असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी लावला होता. परंतू झाले उलटेच. यंदाच दसरा हा पूर्णत: कोरडा गेला. त्यामुळे कमाईतर सोडाच परंतू दसऱ्यासाठी केलेल्या गुंतवणूक देखील आता काही व्यापाऱ्या डोईजड झाली आहे.

हेही वाचाशेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर -

अधिक मास व लग्नसराईने तारले

कोरोना विषाणु संसर्गानंतर प्रशासनाच्या परवानगीने लग्न सोहळे झाले. पंरतू तेही आटोक्यातच. तरीपण या लग्नसराई व त्यानंतर आलेल्या अधिक मासात सोन्याची बऱ्यापैकी विक्री झाली. त्यामुळे सलग तीन महिण्याचा मोठा काळ बंद असतांनाही सराफा बाजारात चहलपहल दिसून आली.

नवरात्रीपासून परत मंदी

सराफा बाजारात नवरात्रीपासून परत मंदी जाणवण्यास सुरवात झाली. परंतू दसरा जवळ आल्याने कमाई होईल असे वाटत असतांनाच दसरा सणाचीही संधी सराफा व्यापाऱ्यांना म्हणावी तशी मिळाली नाही. ऐरवी कोट्यावधीची होणारी उलाढाल चक्क लाखावरच येऊऩ ठेपल्याने सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. सराफा व्यापाऱ्यांनी दसरा सण हातातून गेला म्हणून निराश होऊ नये. आगामी काळात निश्चित हा व्यवसाय पुन्हा उसळी घेणार आहे. दिवाळी व त्यानंतरचा काळ सराफा व्यवसायासाठी सूवर्णसंधी घेवून येईल.

- समीर अंबिलवादे, सराफा व्यापारी, परभणी

loading image