esakal | साठवण तलावावर वीस शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली
sakal

बोलून बातमी शोधा

साठवण तलावावर वीस शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली

साठवण तलावावर वीस शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली

sakal_logo
By
प्रकाश काळे

किल्लेधारुर (जि.बीड) : रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) दुष्कृत्य झाकण्यासाठी तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडण्याचा घाट घालण्याच्या जलसंपदा विभागाचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणुन पाडल्यानंतर उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना तलाव मजबुत स्थितीत असल्याचे सांगुन काढता पाय घेतला.दुटप्पी भूमिका घेत एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांना (Beed) वास्तव माहिती देणारा अहवाल दिला. दुसरीकडे तालुका प्रशासनास आदेश देऊन ग्रामस्थांनी सहकार्य करण्यासाठी कामात अडथळा न आणण्याचे आवाहन करणारे पत्र काढल्यामुळे बाजार समिती सभापती सुनील शिनगारे व शेतकरी बालासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीस युवकांनी सांडव्यावर रात्र जागुन काढली. उपजिल्हाधिकारी चाटे यांच्याशी बोलताना त्यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेऊन प्रशासनाने छळ व कपट करण्यापेक्षा तलावात आम्हा वीस शेतकऱ्यांना जलसमाधी घेऊ द्या.(twenty farmers seat at pond over night in dharur tahsil of beed glp 88)

हेही वाचा: चिरमुड्या भाऊ-बहिणीचा गुदमरुन मृत्यू, आईवडीलांवर उपचार सुरु

रात्री केव्हाही सांडवा फोडण्यासाठी यंत्रे आणलीच तर अगोदर ती आमच्या शरीरावरुन ती घाला असे सांगुन विरोध दर्शवला. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही खाल्लेला नाही. साडंवा फोडला तर आम्ही जलसमाधी घेतलेली असेल अशी आक्रमक भूमिका घेऊन तलावावर रात्र जागुन काढली.

loading image
go to top