esakal | मोठी कारवाई! हिंगोली जिल्ह्यात २० लाखांचा गुटखा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली :  हिंगोली-सावखेडा मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कंटेनरची  तपासणी केल्यानंतर त्यात तब्बल २०. ४५  लाखांचा गुटखा  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  जप्त केला आहे.

मोठी कारवाई! हिंगोली जिल्ह्यात २० लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली-सावखेडा मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कंटेनरची तपासणी केल्यानंतर त्यात तब्बल २०. ४५ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. याबाबत बासंबा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२३) पहाटे आठ जणाविरूध्द गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातून एका कंटेनरमधून गुटख्याची पोते नांदेडकडे (Nanded) जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर (IPS Rakesh Kalasagar), सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे (Hingoli) पोलिस निरीक्षक निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अभय माकणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके , संभाजी लकुळे, भगवान आडे , विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे , सुनील अंभोरे, राजू ठाकूर, किशोर सावंत, जावेद शेख, शंकर ठोंबरे , किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, आकाश टापरे तसेच सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, सुमित टाले, रोहित मुदीराज यांच्या पथकाने बुधवारी (ता.२२) दुपारी वाहनांची तपासणी सुरु केली होती.

हेही वाचा: मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचा इंगा दाखवू, हर्षवर्धन जाधवांचा इशारा

पोलिसांनी एक कंटेनर पोलिसांनी थांबविला चालक बाबुलाल कुशवाह याच्याकडे चौकशी केली. परंतु त्याला पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर कंटेनर ताब्यात घेऊन बासंबा पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी साहित्याची तपासणी सुरु केली असता कंटेनरमध्ये समोरच्या बाजूला गोळ्या, बिस्किटचे बॉक्स, टायर असे साहित्य होते तर ट्रकच्या मध्यभागी असलेल्या पोत्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर मधील सर्व साहित्य खाली उतरवून तपासणी केली. यामध्ये राजनिवास पान मसाला गुटख्याचे १४.४० लाख रुपये किंमतीचे ४८ पोते, तर पान मसाला गुटख्याचे ६.१५ लाख रुपये किंमतीचे २० पोते आढळून आले. या गुटख्याची किंमत २०. ४५ लाख रुपये आहे. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक बालाजी बोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक बाबुलाल कुशवाह, क्लिनर भिम तडवी (रा. रुस्तुमपुर जि. खंडवा , मध्यप्रदेश) शेख फैजान, महमद फारुख महमद शफी , विकी चौरसीया (दोघे रा. इंदौर), अकबर चाऊस , शेख खय्यू (रा. नांदेड) तसेच सलीम गोल्डन जर्दाचे व्यापारी यांच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top