Navratri Festival 2019 : रेणुका देवीला अडीच किलोच्या दागिण्यांचा श्रंगार (व्हिडिओ)

संतोष जोशी
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

साडेतीन शक्ती पीठापैकी पुर्ण पीठ असलेल्या माहुर गडावर नवरात्रोत्सवात रेणुका देवीला विशेष साज, श्रंगार चढवला जातो. देवीला मोठ्या प्रमाणात गुप्तदानात दागिने, रोकड येते मात्र, 1818 मध्ये तयार केलेले अडीच किलो वजनाचे विविध सोन्याचे दागिणे आणि अलंकार देवीला चढविण्यात येतात.

माहूर : साडेतीन शक्ती पीठापैकी पुर्ण पीठ असलेल्या माहुर गडावर नवरात्रोत्सवात रेणुका देवीला विशेष साज, श्रंगार चढवला जातो. देवीला मोठ्या प्रमाणात गुप्तदानात दागिने, रोकड येते मात्र, 1818 मध्ये तयार केलेले अडीच किलो वजनाचे विविध सोन्याचे दागिणे आणि अलंकार देवीला चढविण्यात येतात.

मंगळसुत्र, गहुमाळ, बोरमाळ, पोहेहार,कर्नफुल,बिंदिया असे पंधरा प्रकारचे हिरे आणि सोन्याने मढविलेले हे अडीच किलो वजनाचे दागिणे असल्याची माहिती रेणुका देवी संस्थान समितीचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी दिली.

दागिण्यांनी सजलेल्या रेणुका देवीचं नयन मनोहरी रुप प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक भक्त माहुरगडावर गर्दी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two and a half kilos jewelry for renuka devi mahur

टॅग्स
टॉपिकस