esakal | देशी दारुसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त; वसमत शहर पोलिसांची कामगिरी, नांदेडच्या दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड येथील दोघास वसमत शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २६) सापळा रचून पकडले.

देशी दारुसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त; वसमत शहर पोलिसांची कामगिरी, नांदेडच्या दोघांना अटक

sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : चारचाकी वाहनाद्वारे देशी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या नांदेड येथील दोघास वसमत शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २६) सापळा रचून पकडले. यावेळी चारचाकी वाहनासह दोन लाख ६२ हजार २०० रुपयांचा देशी दारुचा ऐवज जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातून देशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, श्री हेंद्रे बालाजी वडगावे, श्री गोरलावड यांनी देशी दारुची चोरटी वाहतूक पकडण्यासाठी सापळा रचला त्यानुसार शुक्रवारी (ता. २६) रोजी सकाळी बाराच्या सुमारास कवठा रोडवरील मदिना चौकात गुरुपीतसिंग गुलजारसिंग खैरात राहणार दसमेसनगर नांदेड व पवन देवदास शिंदे राहणार माळटेकडी नांदेड हे दोघे कार (एम.एच. १२- १२१०) मध्ये देशी दारु भिंगरी संत्रा असे लेबल असलेले ९६० सील बंद बॉटल ज्याची किंमत ६२ हजार ४०० रुपये व कारची किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख ६२ हजार ४०० रुपयाचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी देशी दारुसह मुद्देमाल जप्त केला असून नांदेडच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड परभणी लाॅकडाऊनमुळे देशी विदेशी दारुची चोरटी वाहतूक वाढली

मागील दोन दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शेजारील नांदेड जिल्हा व परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लॉकडाऊन सुरु आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तू मिळत असल्या तरी तळीरामांना मात्र देशी व विदेशी दारु मिळत नसल्याने या दोन्ही जिल्ह्यातील तळीरामानी व विक्रेत्यांनी वसमतकडे आपला मोर्चा वळवला आहे. या प्रकारामध्ये दारु विक्रेत्यांची चांदी होत असली तरी शेजारील जिल्ह्यातील कोरोना संसर्ग असलेले रुग्णांचा वावर वसमत शहरामध्ये वाढल्याने वसमतमध्ये कोरणा संसर्ग वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image